खानदेशातील थोर कवयत्री बहिणाबाई चौधरी ह्यांच्या नजरेतून गुढी पाडवा ….
!! गुढी उभारनी !!
गुढी पाडव्याचा सन
आता उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देन
सोडा मनातली आढी
गेली साली गेली आढी
आता पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा
अरे , उठा झाडा आंग
गुढीपाडव्याचा सन
आता आंगन झाडून
गेली राधी महारीन
कसे पडले घोरत
असे निस्सयेलावानी
हां हां म्हनता गेला रे
राम पहार निंघूनी
आता पोथारा रे घर
सुधारा रे पडझडी
करी सन सारवन
दारी उभारा रे गुढी
चैत्राच्या या उन्हामधी
जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आता
रामनवमीचा दीस
पडी जातो तो पाडवा
करा माझी सुधारनी
आता गुढीपाडव्याले
म्हना गुढी उभारनी
काय लोकाचीबी तऱ्हा
कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मधी
आड म्हनती उभ्याले
आंस म्हनू नही कधी
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले
कंस म्हनती पाडवा ?
कवयत्री :बहिणाबाई चौधरी
देऊळ दिसले की जसे हात जोडता
तसे आता
पाण्याचा नळ चालु दिसला की बंद
करण्याची
माणूसकी दाखवा...
कारण यातुन भक्ती
घडेल...!!!
🙏🏻शुभ सकाळ🙏🏻
No comments:
Post a Comment