Saturday, July 2, 2016

मग, आम्ही का नाही???"

मग, आम्ही का नाही???"

📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'
नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो

📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे
साम्राज्य उभे करतात...

📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून
बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम'
राष्ट्रपती पदापर्यंत जातात

📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.

📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.

📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'
जगाला प्रेम शिकवतात.

📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे
'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग
निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"

🍒
माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते ,
🍒
परंतु , तो इतरांची किती किंमत
करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .
🍒

🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा 😏अपमानही करू नका आणि कोणाला 😇कमी लेखु नका.
👉तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे.
🌳एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.
✨कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.
✨ रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
✨ ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
✨ दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.
👏 हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.

🍀🍀🍀
लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात.
याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मागुन चालत असतात.
लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय, आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच असत.....

थोडस महत्वाचं____

1) अन्य जाती-धर्मांवर टिका
     करत वेळ वाया घालवू नका.
     जे चांगलं असेल त्या गोष्टी
     आत्मसात करा.💮

2) दंगली- मारामारी करुण आपलं
     नाव खराब करुण घेऊ नका.
     आता लढाईचा काळ
     राहिलेला नाही.💮

3) उच्च शिक्षण तुम्हाला आणि
    तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
    जीवन देऊ शकतं.💮

4) राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
    गुलामी करू नका.

5) आजचा तरुण एकमेकांना मदत
    करुण प्रगती करू शकतो.
    त्यासाठी राजकीय पक्षाची  वा
     नेत्याची गरज नाही.💮

6) मंदिरात दान करण्याऐवजी
    गरीब आणि गरजू तरुणांना
    मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
    मदत करतीलच.💮

7) चार दिवस सुट्टी काढून कुटुंबा  सोबत देवस्थळी, प्रेक्षनीयस्थळी जरुर फिरा पण त्यातला कही वेळ
    समाजाच्या प्रगतीसाठी द्या
    समाजही तुम्हाला कधीतरी
    मदत नक्कीच करेल.💮

8) इंग्लिश बोलायला शिका.
     हा मराठीचा किंवा हिंदीचा अपमान नाही  काळाची गरज  आहे.💮

9) व्यायाम, योग, मैडिटेशन करीता स्वतःसाठी दिवसातून तास भर वेळ द्या. 💮

"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल.

💐
मी मराठी चैनल वर सिंधुताईं ची मुलाक़ात चालू होती...

प्रश्न विचारला मुलाखत घेणाऱ्या मुलीने.
- माई काही दिवासापुर्वी शनी देवाच्या चौथ-यावर एका स्त्री ने प्रवेश केला म्हणून खुप मोठा वाद झाला मग स्त्रीयांना पुरुषाच्या बरोबर स्थान का
नाही?
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री च्या स्वातंत्र्यावर गधा आणली जाते हे योग्य आहे का?

उत्तर :-
शिकलेली मुलगी गेली चौथ-यावर जिला काही काम नव्हते,
आमच्या सारखी म्हातारी नाही जाणार कारण आम्ही आई आहोत ना! कोणाची तरी बायको आहोत.
घरात एवढा मोठा शनि असताना कशाला जायला हवे तिथे?
समाजात किती तरी मोठे प्रश्न, संकटे आहेत. दुष्काळ आहे.
शेतकरी आत्महत्या करतायत,
नको तेथे कशाला ऊर्जा व्यर्थ घालवताय.......

रिपोर्टर :-
पण मुलींचे हक्क ?

माई:-
कसले आलेत ग हक्क अाधी घर संभाला, संसार करा, लेकरं शिकवा आणि धन्याच्या खांद्याला खांदा लावून काम करा.
मान मर्यादा इज्जत त्यामुळे वाढते......
प्रसिद्धि मिळवण्यासाठी फालतु स्टंट करू नका.
आणि कशाला जाता तिकडे देवाला? असं स्वताचं विश्व निर्माण करा की देव तुमच्याकडे आला पाहिजे.....

रिपोर्टर:-
पण माई मुलींचे हक्क??

माई:-
ये गप्प बस गं
काय  तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का?
असल्या फालतु गोष्टीत मला रस नाही..
चल पुढचा प्रश्न विचार...

रिपोर्टर:-गप्प😔😔😔......

या वरुण माई किती परिपक्व आणि समय सूचक आहेत हे समजते.
नको त्या गोष्टी कड़े लक्ष केन्द्रित न करता महत्वूर्ण प्रश्नाकडे लक्ष दया हाच सन्देश.....
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

💎
तुम्ही कोणत्याही ठिकाणी पोहचा,
तिथे तुमच्या आधी कोणी तरी असेलच ...

तुम्ही कितीही सुंदर आणि किंमती वस्तू खरेदी
केलीत
तरी त्यापेक्षा चांगली वस्तू उपलब्ध
असणारच ...

म्हणून कधीही तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका,

कारण या खेळाला अंत नाही ...!!!

जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद संपतो ...!!!

!!!.!!!

No comments: