Sunday, July 24, 2016

सर्वात्मका  शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना

सर्वात्मका  शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना

सुमनात तू, गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना

श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवें
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना

न्यायार्थ जे लढती रणीं
तलवार तू त्यांच्या करीं
ध्येयार्थ जे तमीं चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना

करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउलें
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना....

Friday, July 22, 2016

IBPS Recruitment 2016

IBPS Recruitment 2016

Institute of Banking Personnel Selection (IBPS) invites Online Application for CWE PO/MT-VI for the post of 8822 Probationary Officer/ Management Trainee in Nationalized  Banks and Any other bank or financial institution. Common Written Examination will be conducted online by the Institute of Banking Personnel Selection (IBPS) tentatively in October / November 2016. Apply Online before 13 August 2016.

Participating Organisations :
Allahabad Bank,  Canara Bank,  Indian Bank,  Syndicate Bank, Andhra Bank,  Central Bank of India,  Indian Overseas Bank,  UCO Bank, Bank of Baroda,  Corporation Bank,  Oriental Bank of Commerce,  Union Bank of India, Bank of India,  Dena Bank,  Punjab National Bank,  United Bank of India, Bank of Maharashtra,  ECGC,  Punjab & Sind Bank,  Vijaya Bank, Bharatiya Mahila Bank,  IDBI Bank Any other bank or financial institution.

Job Location : All India

Job Details :

Post Name : Probationary Officer/ Management Trainee (PO/MT)
No. of Vacancy : 8822 Posts
Categories wise Vacancies :

SC : 1338 Posts
ST : 665 Posts
OBC : 2319 Posts
UR : 4500 Posts
Eligibility Criteria for IBPS Recruitment :

Educational Qualification : A Degree (Graduation) in any discipline from a University recognised by the Govt. Of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government.
The result should have been declared on or before 13.08.2016.
Nationality : Indian
Age Limit : 20 to 30 years (As on 01.07.2016)
Age of Relaxation :

Scheduled Caste/Scheduled Tribe : 5 years
Other Backward Classes : 3 years
Persons With Disability : 10 years
Selection Process : Selection process will be based on Online Preliminary Examination, Main Examination & Personal Interview.

Application Fee :

For SC/ST/PWD/EXSM Candidates : Rs. 100/-
For All Others Candidates : Rs. 600/-
The payment can be made by using Debit Cards (RuPay/Visa/MasterCard/Maestro), Credit Cards, Internet Banking, IMPS, Cash Cards/ Mobile Wallets by providing information as asked on the screen.

How to Apply : Candidates are required to apply online through IBPS website http://www.ibps.in/ between 26.07.2016 to 13.08.2016.

Important Dates to Remember :

Starting Date For Submission Of Online Application : 26.07.2016
Last Date For Submission Of Online Application : 13.08.2016
Date of Online Payment of Application Fees : 26.07.2016 to 13.08.2016
Download of Call letter for Preliminary Examination : October 2016
Date of Online Examination Preliminary : 16.10.2016, 22.10.2016 & 23.10.2016
Date of Online Examination (Main) : 20.11.2016
Important Links :

Detail Advertisement Link : http://www.ibps.in/wp-content/uploads/Detailed_advertisment_for_CWE_PO_MT_VI.pdf
Apply Online : http://www.ibps.in/cwe-po-mt-6/

KABALI @12 BEST:

KABALI @12 BEST:

1. Kabali is the 1st Indian
    movie to release across
    30 nations at a time.

2. Kabali is widest release
    across Asian countries.

3. Kabali is going to release
    across 4500 screens in
    China same as PK
    400 screens across US
    300 screens each across
    Malaysia Indonesia and
    Japan ( highest ever for
    any Indian movie so far).

4. Kabali is the only South 
    Indian movie to release
    in over 1000 screens in
    North India.

5. Kabali is releasing across
    double the screens than
    any other Bollywood
    star's film worldwide.

6. Kabali trailer crossed 25
    Million in a week as it is
    released highest ever for
    any Indian movie.

7. Kabali is the 1st Indian
    movie  poster displayed
    in flights buses in India.

8. Kabali is all set to be the
    first movie in the world to
    declare a leave in a state
    ( already by few MNC's
       and small companies).

9. Kabali is releasing in
   12000 screens worldwide
    at a time across 30 nation
    Highest ever*

10. Kabali is the only movie
      to  have a pre booked
      all tickets for all shows
      in USA.

11. Record Booking ever
      with 6500 screens
      already booked FDFS
      3500 screens for FD
      2000 screens entire
      weekend for all the
      shows worldwide.

12. Kabali is the 1st Indian
      movie to release  in
      World's biggest theatre
      Le grand Rex in France
      with 2500 seats.
    
      Kabali has set all
      time record in every
      sector of Indian
      cinema.
      
      All set for a biggest
      blockbuster worldwide.

      SENSATIONAL
      #ATBB#
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
   

      FWD TO ALL *KABALI*
      LOVERS

Good morning and good day to all have a wonderful weekend with Kabali 🎂🎂🎂🎂🎊🎊🎊🎊🎉💐

Tuesday, July 19, 2016

... बाबा रिटायर होतोय ....

||.... बाबा रिटायर होतोय ....||

आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.

आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,
"मी आता रिटायर होतोय, मला आता नवीन
कपडे नको, जे असेल ते मी जेवीन, जे असेल ते
मी खाईन, जसा ठेवाल तसा राहीन."

काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं,
आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजच
तुटावं, अगदी तसं झालं.
एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच
फसलं.

का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ?
मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ?
तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.

आज का त्याने दम दिला नाही, "काय हवं ते
करा माझी तब्बेत बरी नाही, मला कामावर
जायला जमणार नाही."
खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा,
पण तो काकुळतीला का आला?

ह्या विचारातच माझं मनं खचलं.

नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
बाबाच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याबरोबर वाढत होता तो अहंकार,
आणि त्याने वाढत होता तो विसंवाद,
आई जवळची वाटत होती, पण
बाबाशी दुरावा साठत होता.

मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं, पण
ते शब्दात सांगताच आलं नाही,
बाबानेही ते दाखवलं असेल, पण दिसण्यात
आलं नाही.

मला लहानाचा मोठा करणारा बाबा, स्वःताच
स्वतःला लहान समजत होता.
मला ओरडणारा - शिकवणारा बाबा, का कुणास
ठाऊक बोलताना धजत होता.

मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला,
शरीर साथ देत नव्हतं, हे त्या शून्यातून सारं
उभं केलेल्या तपस्वीला, घरात नुसतं बसू देत
नव्हतं. हे मी नेमकं ओळखलं.

खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,
सांगायचच होतं त्याला कि थकलायेस आराम
कर, पण आपला अधिकार नव्हे
सूर्याला सांगायचा कि “मावळ आता”.

लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा,
मधल्या वयात
अभ्यासासाठी ओरडणारा बाबा,
आणि नंतर चांगलं
वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा,
आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतो, तेव्हा वाटतं
कि काही जणू आभाळंच खाली झुकलं.

आज माझंच मला कळून चुकलं..
🚶🚶🏻🚶🏼🚶🏽🚶🏾🚶🏿

दैव आणि कर्म


*नक्की वाचा छान आहे..*

*दैव आणि कर्म*

      आमच्या गल्लीत एक पानवाला आहे. त्याच्याकडे
पाहिले कि असे वाटते कि तो आपलीच वाट पहतो. त्याच्याकडे जो पण ग्राहक गेला कि तो त्याच्याशी गप्पा गोष्टी व चर्चा करत असतो. त्यात त्याला फार आनंद व समाधान वाटत असते. पान बनवतांना त्याचा बरा वेळ जायचा. मी फार वैतागायचो.
       एक दिवस मी ठरवले याला फार चर्चा करायची हौस आहे का? आज त्याला असा प्रश्न विचारतो कि त्याने परत चर्चा बंद केली पाहीजे.
        मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर देवू शकतो का? तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
         मी विचारले कि माणुुस मेहनत करतो मग त्याला यश मिळाले कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?
         मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.
           त्याने उत्तर दिले, तो म्हणाला मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?
            तो म्हणाला जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात तश्याच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या. एक मेहनत चावी ती आपल्या पाशी असते तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते.
          आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.
          यशा साठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे त्या शिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.
मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग व नुसती भक्ती करुन उपयोग नाही.
         *यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ति दोन्ही आवश्यक आहे.*

          *.....*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

थोडक्यात गुरुपौर्णिमेचे महत्व आणि माहिती:-

The quality of an evolved consciousness is sincerity, confidence, sensitivity, refinement.
Wish you happy Guru Pournima
Good morning...

थोडक्यात गुरुपौर्णिमेचे महत्व आणि माहिती:-

आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.

आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.

गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे.

गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो –

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.

श्री  गुरुदेव दत्त.

महर्षि व्यास - लेखक : डाॅ.प.वि.वर्तक

महर्षि व्यास - लेखक : डाॅ.प.वि.वर्तक

   आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात; कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही; कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही.
   व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणुन त्यांना कृष्ण द्वैपायन असे नांव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना 'व्यास' ही पदवी मिळाली. पराशर ऋषीपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. शूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणामध्येहि वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की तूं स्मरण केलेस की मी लगेच भेटेन.
   व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेहि नंतर त्यांनीच रचली अशी कल्पना आहे. महाभारत हा अतिविस्तृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले, तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहीले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनीहि अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवि असले तरी केव्हा तरी अडचण येई; तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना करीत. महाभारतात असे 8800 गूढ श्लोक आहेत.
   महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले होते. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडु, व विदूर यांना जन्म दिला. ते स्वतः शास्त्रज्ञ, सायण्टिस्ट होते. त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन, त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे पूरे ज्ञान त्यांना होते, त्यामुळे त्यांनी 'गुणविधी' हे सायण्टिफिक नांव त्यांनी त्या तत्त्वांना योजले. गुण व विधी म्हणजे कामे ठरविणारी ही तत्त्वे 23 असतात हेहि त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स क्रोमोसोम्स 23 आहेत असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेहि सायन्सने आता मानले आहे. व्यासांना खगोलशास्त्रहि अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्युन, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन-निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध रविवार दि.16ऑक्टोबर5561 इसवीसनपूर्व या दिवशी झाले हे मी निश्चित ठरवू शकलो.
   अभिजित् नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनहि केवळ एकाबद्द्ल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इ.सनपूर्व 12000वर्षे या काळी ढळले होते हे मानते, यावरुन व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. 'जी हलत नाहीत ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात', असे व्यास म्हणतात, तेहि आजचे विज्ञान मानते आहे.
   महाभारतयुद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरुन व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहणसमयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहणसमयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरुन उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते.
   'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्|' व्यासांनी सारे जग उष्टे करुन टाकले आहे', असे म्हणतात ते यावरुन सत्य ठरते. कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आइनस्टाइन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अन्तराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळेल. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की ककुद्मी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि 27 चतुर्युगांनी म्हणजे किमान 216 वर्षांनी परतला, तरी तो जीवंत राहीला आणि रेवती तरुणच राहीली होती. तिचे लग्न बलरामशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्त्वहि व्यासांनी या कथेत सांगितले आहे.
   परा व अपरा या दोनहि विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले होते. सिद्धीहि मिळवलेल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःचा शिष्य संजय यास दिली होती; येवढे सामर्थ्य होते. त्यामुळे ते जगत्गुरु ठरले; त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात.

गुरुपौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्छा

🙏🙏🙏

गुरुपौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्छा!!!
🌹🌹🌹

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः ,
गुरुर साक्षात परम ब्रह्म , तस्मै श्री गुरुवे नमः
ध्यान मूलं गुरुर मूर्ति , पूजा मूलं गुरु पदम्
मंत्र मूलं गुरुर वाक्यं , मोक्ष मूलं गुरुर कृपा ..........
आप सभी पर गुरु की कृपा बनी रहे ,
गुरु पूर्णिमा के पावन पर्व पर
आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ....

गुरुपोर्णिमेच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा. !!*

*॥ गुरुब्रह्मा गुरूविष्णू: गुरुदेवो महेश्वरा:*
*गुरु: साक्षात परब्रहम तस्मै श्रीगुरवे नमः ॥*
*************************************************
*ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे |*
*त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे ||*
*मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी |*
*तिथे तुझे सदगुरू पाय दोन्ही  ||*
**********************************************

🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

ॐ गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा:।
गुरु साक्षात परं ब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ।।                 
गुरु पूर्णिमेच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा।

🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

As you walk with the Guru,
you walk in the light of Existence,
away from the darkness of ignorance.
You leave behind all the problems of your life and
move towards the peak experiences of life.
🌹Happy Guru Purnima🌹

*गुरुपौर्णिमा*

*सर्व प्रथम मला ज्यांनी जन्म दिला त्या माझ्या आई-वडिलांना प्रणाम.*

*हिंदु धर्माचा धार्मिक ग्रंथ असणाऱ्या व आयुष्यातील प्रत्येक वळणावर अर्जूना इतकीच मला मार्गदर्शक असणाऱ्या गुरू भगवद्गीतेला प्रणाम*🙏🏻

*मला शिकवलेल्या सर्व सरांना प्रणाम*🙏🏻

                आणि

*माझ्या आयुष्यात गुरू व मित्र परिवार , हितचितंक तसेच ज्यांनी ज्यांनी चांगल शिकवलं(लहान आणि मोठे)त्या माझ्या मित्राना प्रणाम*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*गुरूपौर्णिमेच्या सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा..*

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.....
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य....
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.....
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य......
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक......
आजपर्यंत कळत - नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन...!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

गुरुपूर्णिमा पर गुरु को प्रणाम

उन सभी गुरुजन को प्रणाम जिन्होंने मेरे इस जीवन को अपनी शिक्षा, अपना ज्ञान, अपना आशीष देकर सफल बनाया । मेरे  जीवन में आये उन सभी गुरुजनो  जिन्होंने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से ज्ञान दिया , जीने की कला सिखाई, अच्छे बुरे में अन्तर समझाया, जीवन के संघर्ष में निरंतर आगे बढ़ने की  राह दिखाई ऐसे सभी गुरुजनो को भी प्रणाम।

🙏  सूरज के बिना सुबह नही होतीं
       चन्दा के बिना रात नही होती
🙏बादल के बिना बरसात नही होतीं
     गुरू बिना नैया भव से पार नही होतीं
     👏गुरू पूर्णिमा की           शुभकामनाएँ 👏
     🙏 शुभ प्रभात 🙏

*"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"*

माझ्या जीवनात मर्गदर्शन करणाऱ्या
ज्ञात-अज्ञात, लहान-मोठया अशा सर्वांना,

*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!*

😊🙏

"As you walk with the Guru, you walk in the light of existence,

Away from darkness of ignorance.

You leave behind all the problems of your life and

Move towards the peak experience of life."

Happy Guru Purnima!

Monday, July 18, 2016

याला म्हणतात नविन जोक्स...!!!

माझी  नोकरी  म्हणजे .......

माझी  नोकरी  म्हणजे याहूनही खूप काही आहे ,
ती माझा मोकळा श्वास आहे ,
समदुःखी मैत्रीणीँचा सहवास आहे ,
जीवनविषयक  अभ्यास आहे ,
तो माझा  आत्मविश्वास आहे ,
मनमोकळ्या हास्याचा तास आहे ,
अनुभवाचे आकाश आहे ,
चार  भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे ,
तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे ,
घरगुती ताणतणावातून सुटकेचा निश्वास आहे ,
कर्तुत्व सिद्ध करायचा ध्यास आहे ,
म्हणून जाण्यायेण्याचा त्रास आहे तरी मला नोकरीची आस आहे .

(नोकरी करणाऱ्या व करत होत्या त्या माझ्या प्रत्येक
मैत्रिणीसाठी ).

__________________________________________
याला म्हणतात नविन...!!!
😜😛😛😛😛😛😜

पेपर सुटल्यानंतरच्या
प्रतिक्रीया

दहावी अ  :-  सगळं सोप्प होतं😎 
                                          

दहावी ब:- काही प्रश्ऩ सोपे होते 😌

दहावी क:- बरा होता पेपर😊

दहावी ड:-  मँडम  काय दिसत होती 😳😁😁😁😁....!!
__________________________________________
👍
पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधुन गप्पा मारत होत्या.
.
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.
.
काहीवेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या....
.
.
.
.
.
.
"अय्या, तू कोण.??"
😂😂😂😂😂
__________________________________________
कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला ,

पेपरची पहीलीच हेडींग ......

स्वाईन फ्लू चे 8 बळी.......

लगेच बायकोने मला हाक मारली .....

अहो ऐकलंत का........?

हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......?

त्याने म्हणे 8 बळी घेतले.....🎾🎾🎾🎾🎾🎾🎾🎾
बायको जोमात..नवरा कोमात😝😝😂😂
_____________________________________________
वर्गामध्ये बाईने मूलांना विचारलं...
.
.
बाई-सांगा गंगा कुठून निघते अन कुठे जाऊन भेटते??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मण्या-बाई... गंगा शाळेच्या निमित्ताने घरातून निघते
आणि मंदिराच्या मागे दिप्याला जाऊन भेटते..!!!
.
बाईने धू धु धुतला..😳😳😳
____________________________________________
वडिल : इतका मार खातोस रोज, तुला राग येत नाही का रे माझा..?
:
मुलगा : येतो ना...!
:
वडिल : मग काय करतोस तू राग आल्यावर...?
:
मुलगा : मी संडास घासतो...!
:
वडिल : संडास घासून राग कसा काय शांत होतो...?
:
मुलगा : मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो...!
:
मुलाला संडासात घालून घालून मारला.
😧😧😧😧😧😧😧😧😧😧😧
__________________________________________
काय माहीत तिला तिच्या सौंदर्याचा एवढा
.
का गर्व आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बहूतेक तिचं आधार_कार्ड आजुन आलेल नसेल..!
😂😂😂😂
__________________________________________
एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो......

क्राइम ब्रँच - हा…बोला....

पोलिस - साहेब, मी ढापणे  शिपाई बोलतोय, एक खुन झालाय..... इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली...

क्राईम ब्रॉच - मग तुम्ही तिला अटक केली का नाही......

पोलिस - नाही साहेब..............
फरशी अजुन वाळली नाही ......😂😂😂😂😂😂😂😛😛😂😛😄😄😛😛😜😜😛😂😂😂😂😂
___________________________________________

🙏🏻😀राम राम...!😀🙏🏻

           "आप का ख़ुश रहना ही आप का बुऱा चाहनें वालों के🌷 
               
               लिए सबसे बड़ी सजा है...!"🌹

             💐💐💐