Sunday, March 26, 2017

सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी

*सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी*
🔹कायम चेहऱ्यावर हास्य ठेवा.
🔹रोज सकाळी किमान पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात थांबा.
🔹तुमच्या आसपास प्रेमळ आणि सकारात्मक विचारांच्या व्यक्ती राहतील याची काळजी घ्या.अगदी ऑनलाईनदेखील
सकारात्मक विचारांच्याच लोकांशी संवाद साधा.
🔹तुम्हाला काही तरी नवीन शिकवणारे प्रेरणा देणारे वाचा.
🔹दिवसभर कुठल्या न कुठल्या कामात राहा.
🔹तुम्हाला आनंद मिळेल असे काही तरी दिवसभरात करा.
🔹सकाळी उठल्यावर आरशात पहा आणि स्वत:ला शुभेच्छा द्या.
🔹भरपूर हसा.
🔹गरजूंना मदत करा.
🔹चिंता झटकून टाका.
🔹चांगली स्वप्ने पहा.
🔹अस्वस्थ गोष्टीतून स्वस्थता मिळवण्याचे कौशल्य आत्मसात करा.
🔹तुम्हाला आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
🔹पाळीव प्राण्यांशी खेळा.
🔹तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या कायम स्मरणात ठेवा. त्याची उजळणी करत राहा.
🔹पुरेशी झोप घ्या.गरज वाटेल तेव्हा एखादी डुलकी घ्या.
🔹नियमित व्यायाम करा.
🔹स्वत:वर विश्वास ठेवा.
🔹सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी
उद्दिष्ट साध्य करा आणि नवीन उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामाला लागा.
🔹मुल्ये विसरू नका.
🔹रोज पाच जणांना कडकडून मिठी मारा.
🔹लक्ष केंद्रित करा, केंद्रित करा आणि केंद्रित करा.
🔹संगीत ऐका किंवा तुमची आवडती गाणी गुणगुणा.
🔹जुन्या चांगल्या आठवणींना उजाळा द्या.
🔹नवीन काहीतरी शिका.
🔹स्वत:वर भरपूर प्रेम करा.
🔹डोळे मिटा आणि तुमची स्वप्ने आणि ध्येय शांतपणे पहा.
🔹लोकांचे मनापासून कौतुक करा.
🔹घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा.
🔹उत्साही रहा, चेष्टामस्करी करा.
🔹आव्हानांना सामोरे जा.
🔹जोखीम उचला.
🔹योग करा.
🔹स्वत:च्या महत्त्वाकांक्षांना महत्त्व द्या. रोज त्यावर थोडेतरी काम करा.
🔹तुमच्या कष्टांचे तुम्ही सकारात्मक पद्धतीने कौतुक करा.

No comments: